मोबाइल मार्केटमध्ये दररोज उचापती होतात. यंगर्सच्या हाती नवनवे मोबाइल दिसू लागतात. अशावेळी तुमचा पिस आऊटडेटेड वाटायला लागतो. आता सध्या आयबॉलने अॅण्डी सिरिजमध्ये दोन स्मार्ट फोन आणलेत.. अॅक्टर अजितच्या टोनमध्ये.. स्मार्ट फोन.. स्मार्ट बॉय..
[facebook]
प्रतिक मुकणे (info@pratikmukane.com)
इंडियन मोबाइल वेंडर ‘आयबॉल’ हे नाव म्हटले की, त्याचा संबंध संगणक आणि त्यासाठी आवश्यक असलेले की-बोर्ड, माऊस, स्पीकर या गोष्टींसोबत जोडला जातो. मात्र अलीकडच्या काळात मोबाइल तंत्रज्ञानात पाया रोवणाऱ्या आयबॉलने ‘अॅण्डी १, २, ३.५ आणि ४.५ नंतर आता आपल्या ग्राहकांसाठी अॅण्ड्रॉइड अॅण्डी सिरिजमध्ये ‘अॅण्डी ५ एल’ आणि ‘अॅण्डी ५ एलआय’ हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.
दिसायला आकर्षक आणि कमी दरात मिळणाऱ्या आयबॉलच्या ‘अॅण्डी ५ आणि ५ एलआय’ या स्मार्टफोन मॉडेलमध्ये पाच इंचांची डब्ल्यू-व्ही-जी-ए अल्ट्रा सॉफ्ट स्क्रीन आहे. तर स्क्रीनचे रेझल्युशन ४८०-८०० पिक्सल देण्यात आले आहे.
‘अॅण्डी ५ एल’ची इंटरनल मेमरी ४ जीबी असून एक्स्टर्नल मेमरी १६ व ३२ जीबी कार्डद्वारे वाढवली जाऊ शकते. विशेष म्हणजे ‘अॅण्डी ५ एल आणि एलआय’मध्ये फ्लश लाइटसह ८ मेगा पिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तर व्हीडियो कॉलिंगसाठी फ्रंट फेसिंग व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. अॅण्ड्रॉइड ४.० आइस्क्रीम सॅण्डविच ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या या मॉडेलमध्ये ३जी आणि व्हायफायची सुविधा देण्यात आली आहे.
अॅण्डी ५ आणि ५ एल आय’ या दोन्ही मॉडेलमध्ये दोन सीमकार्डचे स्लॉट आहेत. प्रवासात असताना योग्य मार्ग शोधण्यासाठी जीपीएस आणि ए-जीपीएस देण्यात आले आहे.
या दोन्ही मॉडेलसोबत कंपनीद्वारे फ्लिप कव्हर मोफत देण्यात येत असून, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री करणाऱ्या ऑनलाइन संकेतस्थळांवर ‘अॅण्डी ५ आणि ५ एल आय’ हे मॉडेल १० हजार ४९० रुपयांना उपलब्ध आहे. आयबॉलच्या या नवीन मॉडेलमध्ये विशिष्ट गोष्टी असल्या तरी त्यांची स्पर्धा मायक्रोमॅक्स ‘ए११० कॅन्वास टू’ आणि ‘कार्बन स्मार्ट ए१११’ सोबत केली जात आहे.
अॅण्डी ‘५एल आणि ५एलआय’ स्मार्टफोन मॉडेलच्या काही महत्त्वपूर्ण बाबी –
डिस्प्ले : ५ इंच डब्ल्यू-व्ही-जी-ए अल्ट्रा सॉफ्ट कॅपेसिटिव्ह टच स्क्रिन (रेझल्युशन४८०-८०० पिक्सल), जी-सेंसर, लाइट सेंसर
ऑपरेटिंग सिस्टम: अॅण्ड्रॉइड ४.० आइस्क्रीम सॅण्डविच
प्रोसेसर : १ गिगाहाड्ज डूएल-कोर कोरटेक्स-ए९
रॅम : ५१२ एमबी
मेमरी : इंटरनल स्टोअरेज २ जीबी व एक्स्टर्नल मेमरी (मायक्रो एसडी कार्ड -३२ जीबीपर्यंत)
कॅमेरा : ८ मेगा फिक्सल फ्लॅश लाइटसह (३२४७-२४४९ पिक्सल); ०.३ मेगा पिक्सल व्हीजीए फ्रंट फेसिंग कॅमेरा (६४०-४८० पिक्सल), व्हीडियो कॉलिंग आणि रेकॉर्डिग
नेटवर्क : जीएसएम ९००/१८००/यूएमटीएस२१०० मेगाहर्डज, जीपीआरएस,एड्ज
कनेक्टीव्हिटी : व्हायफाय/ब्ल्यूटूथ/मायक्रो यूएसबी
इतर फिचर्स : एसएमएस, एमएमएस, ई-मेल, इन्स्टंट मेसेजिंग, सोशल नेटवर्किंग, एफएम, एमपी थ्री म्युझिक, जावा, जीपीएज.