एव्हरेस्टच्या दिशेने

share on:

आजवर अनेक गिर्यरोहकांनी माऊण्ट एव्हरेस्ट हे शिखर गाठले असून विक्रम प्रस्थापित केले आहेत. परंतु पहिल्यांदाच भारतातील एकाच शाळेतील विद्यार्थ्यांचा एक संघ, ‘एव्हरेस्ट ट्रेक्स’ची जयंती साजरी करण्याच्या निमित्तने एव्हरेस्ट शिखर गाठून जागतिक विRम करण्यासाठी सज्ज झाला आहे.  

‘एव्हरेस्ट ट्रेक्स’च्या ६०व्या जयंतीचे औचित्य साधून देशातील तरुणांमध्ये धाडसी खेळांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी, तसेच पुढच्या पिढीला अ‍ॅड्व्हेन्चर्स खेळांविषयी प्रेरित करून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ‘वूडलँड’ या कंपनीने पुढाकार घेतला आहे. ‘टिन्स टेम एव्हरेस्ट’ या प्रकल्पा अंतर्गत हिमाचल प्रदेशमधील सनवार येथील ‘द लॉरेन्स स्कूल’ या एकाच शाळेतील सहा विद्यार्थ्यांच्या एका चमूला ही कंपनी एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी पाठवत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या अ‍ॅड्व्हेन्चरमध्ये सहभागी होणारे सर्व विद्यार्थी हे केवळ १६ वर्षाचे आहेत.

सात महिन्यां अगोदर जेव्हा ही कल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा जवळपास ३० तरुणांनी एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पंरतु शारीरिक क्षमता आणि एलिमिनेशन राऊंडमध्ये केवळ १२ युवक यशस्वी झाले. तर  अंतिम चाचणीत केवळ सहा विद्यार्थी पात्र ठरले.

‘टिन्स टेम एव्हरेस्ट’ अंतर्गत शिखर गाठण्यासाठी जाणा-या विद्यार्थ्यांमध्ये लॉरेन्स शाळेतील हकिकत सिंग ग्रेवाल, गुरुबादत सिंग, अजय सोहल, पृथ्वी सिंग, शुभम कौशिक आणि फतेह सिंग यांचा समावेश आहे. ‘हिमालयन माऊंटेनेरिंग’ या संस्थेचे मुख्याध्यापक कर्नल निरज राणा यांच्या नेतृत्वाखाली हे विद्यार्थी सुमारे ८ हजार ८५० मीटरचे एव्हरेस्ट शिखर गाठणार आहेत.

‘‘एव्हरेस्टची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी आपली निवड होणे आणि इतक्या तरुण वयात ही संधी मिळणे हे आपले भाग्यच असून त्यामुळे स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण होईल व आत्मविश्वास देखील वाढेल’’, असे अजय सोहल याने सांगितले .

तर आपण केवळ शिखर गाठत नसून, स्वत:ला एका सर्वेच्च स्थानावर घेऊन जातो, हे सांगणा-या सर एडमंड हिलरी यांना आपले प्रेरणास्थान मानणा-या पृथ्वी सिंग याचे शिखर गाठण्याचे स्वप्न वास्तवात उतरले असून त्याचा आपल्या संपूर्ण जीवनावर सकारात्मक परिणाम, अशी त्याची भावना आहे.

अ‍ॅड्व्हेन्चर्स खेळांना नेहमी प्रोत्साहन देणा-या ‘वूडलॅन्ड’ने या आधी देखील एव्हरेस्ट शिखर चार वेळा गाठणारा पहिला भारतीय ठरलेल्या लोवराज सिंग धरमशक्तू याला गेल्यावर्षी एव्हरेस्ट शिखर स्वच्छ करण्यासाठी ‘प्रो प्लॅनेट क्लाइंब्स एव्हरेस्ट’ या प्रकल्पा अंतर्गत पाठवले होते. तर यावर्षी प्रथमच जगातील एकाच शाळेतील सहा विद्यार्थ्यांच्या संघाला सर्वोच्च शिखरावर जागतिक विRम करण्यासाठी पाठवत असल्याने हा ऐतिहासिक प्रकल्प ठरेल, असे वूडलँडचे व्यवस्थापकीय संचालक हरकिरत सिंग म्हणाले.

शिखर गाठण्याच्या या उपक्रमात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी आपला प्रवास ६ एप्रिल २०१३ रोजी सुरू करतील. ६ एप्रिलला ते दिल्लीहून काठमांडूला रवाना होतील व काठमांडूत तीन दिवस मुक्काम करतील. तर १० एप्रिलला लुकलासाठी रवाना होतील व ११ ते १९ एप्रिल या कालावधीत ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ पर्यंत ट्रेक करून मुख्य प्रवासाला सुरुवात करतील.

‘‘कोणत्याही परिस्थितीत हार न मानता, झुंज देत उर्वरित आयुष्य एखाद्या चॅम्पियन प्रमाणे जगणे ही बाब मला नेहमी धाडसी पाऊल उचलण्यास प्रेरणा देते. त्यामुळे हे शिखर मी माझ्या कुटुंबासाठी, शाळेसाठी आणि देशासाठी यशस्वीपणे गाठणार आहे’’, असे शुभम कौशिक याने सांगितले.

एव्हरेस्ट गाठण्यासाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनोबल व शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी सप्टेंबर ते जानेवारी या पाच महिन्याच्या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले आहे.‘हिमालयन माऊंटेनेरिंग’ या संस्थेतून त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षणाचा भाग म्हणून या विद्यार्थ्यांनी सिक्कीममधील ‘फ्रे’(५८३० मीटर) आणि ‘बी.सी.रॉय’ (५१८२ मीटर) हे शिखर पार केले आहे. तसेच ‘थर’ या वाळवंटात एक हजार किलोमीटर अंतराच्या सायकलिंगचे देखील प्रशिक्षण घेतले आहे. जगात पहिल्यांदाच शाळेतील विद्यार्थ्यांंचा संघ एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी जात असून ही खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. हे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले मनोबल वाढवले असून आवश्यक सर्व प्रशिक्षण घेतले असल्याचे कर्नल नीरज राणा म्हणाले.

वातावरणात बदल न झाल्यास हे विद्यार्थी ठरलेल्या तारखेनुसार २६ ते २८ मे या कालावधील ते शिखर गाठतील.

Pratik Mukane

Pratik Mukane

Pratik Mukane is an engaging journalist with a strong presence and a passion for writing and constantly chasing breaking news. He enjoys meeting new people, telling meaningful stories and having a few cups of coffee in between!

1 Comment

  1. Yash Zirpe, son of Umesh Zirpe (Leader Lhotse-Everest 2013), recently told his experience about this event —- I myself Yash Zirpe,11 years old, have completed Everest Base Camp Trek successfully. For the first time I went to the high altitude trek. The Everest Base Camp is located at the altitude of 17,500ft. The trek is of 75km. Daily we had to walk 6-7 hrs. It was tough, hard & due to less oxygen we had to face breathing problems. But I used to practice bhramavidya’s breathing exercises regularly which helped to keep me physically and mentally fit and helped me to face the challenges of the trek positively.

Leave a Reply to suneeta Cancel reply

share on: