निसर्गरम्य पर्यटनस्थळांची माहिती

share on:
मुंबईच्या गोंगाटात, मोबाईलच्या हव्यासात दिवस दिवस घामेजून जातो. कितीही बॉडीस्प्रे मारा यार.. पण जरा पाऊस बरसला की, त्या मातीचा सुगंध मोहवून टाकतो. हे पावसाचं वातावरण मस्तपैकी शरीरभर अनुभवता यावीत, म्हणून आम्ही तुम्हाला शॉर्ट बट स्वीट अशा पर्यटनस्थळांची भरगच्च माहिती देतोय.

[facebook]

जव्हार

palaceशहरी पर्यटकांसमोर जेव्हा जेव्हा पर्यटनाचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्या डोळयांसमोर अनेक पर्यटनस्थळांप्रमाणे जव्हार हे ठिकाणदेखील येत़े. ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हारचे निसर्गसौंदर्य पावसाळयात अधिकच खुलून दिसत़े. स्वाभाविकच पर्यटकांची पावले जव्हारच्या दिशेने वळू लागतात़. राज्यभरातील अनेक आदिवासी विभागांपैकी एक म्हणजे जव्हाऱ. समुद्र सपाटीपासून १७०० मीटर उंचीवर असलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराकडे अलीकडच्या काळात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. जव्हारकडे जाताना वाटेत लागतो तो म्हणजे जयेश्वर घाट़. नागमोडी वळणे असलेला हा घाट धोकादायक वाटत असला तरी निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने आकर्षक आह़े. पावसाळयात हा संपूर्ण घाट धुक्यात बुडालेला असतो़. सूर्याची किरणे आणि धुक्याची दुलई यातून दिसणारा हिरवागार निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो़. घाटाभोवती असलेले छोटे-छोटे धबधबे वाटसरूंना थांबण्यास भाग पाडतात़. वृक्षराजीने वेढलेल्या या घाटातून प्रवास करताना एक सुखद अनुभव अनुभवण्यास मिळतो़, म्हणून जव्हारला जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हटले जात़े. निसर्गाबरोबर इथली आदिवासी संस्कृती पाहण्याकरता, अभ्यासण्याकरताही देश-विदेशातील पर्यटक येत असतात. उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या, घनदाट जंगल, मनास सुखावणारा निसर्ग, चारही बाजूंनी पसरलेल्या काजूच्या बागा आणि त्याच्या गर्द छायेत लपलेला जय विलास पॅलेस, भोपतगड किल्ला, दाबोसा धबधबा, हनिमुन पॉइंट, सनसेट पॉइंट ही ठिकाणे पाहिल्यानंतर जव्हारमधून सहजासहजी पावले निघत नाहीत. जव्हारपासून २ किमी अंतरावर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिळपामाळ टेकडी आह़े. या टेकडीवरून जव्हारचे विहंगम दृश्य अगदी खुलून दिसते. कामाच्या व्यापातून मुक्त होऊन जर ‘क्षणभर विश्रांती’ घेण्याची इच्छा असेल तर मुंबईपासून १८० किमी आणि नाशिकपासून ८० किमी अंतरावर असलेले जव्हार हा उत्तम पर्याय आह़े. परिवहन मंडळाची बस अथवा खासगी वाहनाने जव्हारला जाता येतं. जव्हारमध्ये राहण्यासाठी अनेक खासगी हॉटेल्स, रिसॉर्टस आणि गेस्ट हाऊसची सोय आह़े.
शहरी आणि गावरान या दोन्ही पद्धतीच्या जेवणाची चव येथे चाखायला मिळत़े. या शहराला आपण एकदा भेट दिल्यास येथे पुन्हा येण्याची इच्छा नक्कीच निर्माण होते.
बघण्यासारखे ठिकाण: हनिमुन पॉइंट – सनसेट पॉइंट- जय विलास पॅलेस – शिळपामाळ – जय सागर डॅम – मूक-बधीर विद्यालय
जवळील रेल्वे स्टे.- ठाणे-१३० किमी

 

इगतपुरी- अ वीकेण्ड डेस्टिनेशन

igatpuriआंतरराष्ट्रीय विपश्यना अकादमीसाठी इगतपुरी हे शहर जेवढे प्रसिद्ध आहे, तेवढेच ते पर्यटनासाठीदेखील प्रसिद्ध आह़े. नाशिकपासून ४५ किमी अंतरावर आणि मुंबईपासून १३० किमी अंतरावर असलेले इगतपुरी हे शहर पश्चिम घाटांनी वेढलेले असून पावसळ्यात ’वीकेण्ड एन्जॉय’ करण्यासाठी उत्तम पर्याय आह़े. थंड हवा, सुंदर आणि स्वच्छ परिसर, पक्ष्यांचा किलकिलाट यामुळे मन अगदी प्रफुल्लीत होतं. इतर मोसमांच्या तुलनेत पावसाळ्यात इगतपुरीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत़े  हिरवीगार झाडे, धुकं, ठिकठिकाणी असलेले धबधबे मनाला सुखावणारा अनुभव देऊन जातात़.  पर्यटनाप्रमाणेच प्राचिन मंदिरांसाठीदेखील हे शहर प्रसिद्ध आह़े.  इगतपुरी सोडल्यानंतर व कसारा घाटाच्या सुरुवातीला घाटनदेवीचं मंदिर आह़े.  हे मंदिर अतिशय निसर्गरम्य वातावरणात आह़े.  या देवीचे वास्तव्य कसारा-इगतपुरी घाटमाथ्यावर आहे, म्हणून या देवीला ‘घाटनदेवी’ असं नाव पडलं. घाटनदेवीच्या मंदिरातून पश्चिम घाटाचा परिसरआणि सह्याद्री पर्वताच्या सुंदर नजाऱ्याचे दर्शन घडते. जर आपण पर्यटक इतिहास आणि वास्तुकलेचे प्रेमी असाल तर त्रिंगलवाडी किल्ल्याला आवश्य भेट द्या़. इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरली आह़े. याच रांगेत त्रिंगलवाडी बळवंतगड आणि कावनई हे किल्ले आहेत़. समुद्र सपाटीपासून ३ हजार फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्यावरून संपूर्ण इगतपुरीचा नजारा दिसतो. कसारा घाटाजवळ भातसा रिव्हर व्हॅली, उंट दरी अशी मस्त ठिकाणं आहेत. कसारा घाटातील धुकं अनुभवणं तर एक रोमांचकारी अनुभव असतो़.  ट्रेकर्ससाठीदेखील इगतपुरी खास प्रसिद्ध आह़े. दरवर्षी अनेक ट्रेकर्स विविध भागातून ट्रेकिंगसाठी इथे येतात़.  शिवाजी महाराजांच्या जीवनाचे दर्शन घडवणारा ‘वालावलकर संग्रहालय’ हे एक अनोखे संग्रहालय आह़े.  तर पर्यावरणप्रेमींना विविध प्रकारच्या वनस्पती आणि पक्ष्यांच्या प्रजाती इथे बघायला मिळतील़. इगतपुरी गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मगिरी हा मठ आह़े. विपश्यना या ध्यानाच्या एका प्रकाराची साधना करण्यासाठी विविध ठिकाणांहून, तसेच परदेशांतूनही अनेक लोक इथे येतात़. त्यामुळे पावसळ्यात जर लाँग ड्राइव्हला जायचे असेल आणि रोमँटिक वीकेण्ड एन्जॉय करायचा असेल, तर इगतपुरी या डेस्टिनेशनची निवड करण्यास हरकत नाही़.
 बघण्यासारखे ठिकाण: भातसा रिव्हर व्हॅली- घाटनदेवी मंदिर- त्रिंगलवाडी किल्ला-अवंदा किल्ला-धम्मगिरी विपश्यना केंद्र
 जवळील रेल्वे स्टेशन-   कसारा/नाशिक

 

क्या बोला, चलो सापुतारा

Image:गुजरातमधील एकमेव आणि प्रसिद्ध असे हिल स्टेशन म्हणजे डांग जिल्ह्यातील सापुतारा़.  आदिवासी संस्कृतीला कुठेही धक्का न लावता गुजरात टुरिझमने या नियर्गरम्य ठिकाणाचा उत्तम विकास केला आहे. गुजरात राज्याच्या वनसदा राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेले सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे १ हजार मीटर उंचीवर असून सातपुडा पर्वतराजीवर एका पठारासारख्या ठिकाणी वसलेले आह़े.  पर्यटनाचा विकास व्हावा, यासाठी गुजरात टुरिझमद्वारे विविध उपक्रम राबवले जातात़. याचाच एक भाग सापुतारा मान्सून फेस्टिव्हलचे आयोजन केले जात़े. परिसरातील आदिवासी लोकांचे जीवन, त्यांची कला, संस्कृती, जंगलातील हिरवीगार झाडे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा याबरोबरच मान्सून फेस्टिव्हल प्रेक्षकांना चांगलीच पर्वणी ठरेल. दोन वर्षापासून सापुतारामध्ये मान्सून फेस्टिव्हल आयोजित करण्यात येत आहे. गतवर्षी ३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत फेस्टिव्हल साजरा करण्यात आला होता.
जवळपास एक लाखपेक्षा अधिक पर्यटकांनी या महोत्सवाला हजेरी लावली. अ‍ॅडव्हेंचर आवडणाऱ्या पर्यटकांसाठी इथे विविध प्रकारचे पहाडी खेळ उपलब्ध आहेत़.  रॉक क्लाइबिंग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट, हाय रोप, क्वॉड बायकिंग यांसारखे विविध थरारक खेळांची मजा अनुभवता येत़े..
सापुतारा हिल रिसॉर्टचे मुख्य आकर्षण सापुतारा तलाव आह़े.  या लेकमध्ये पर्यटकांना बोटिंगची मजा लुटता येत़े. नागेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकराची भव्यदिव्य मूर्ती पाहून मन प्रसन्न होत़े. तर सनराइज आणि सनसेट पॉइंट या ठिकाणांहून सूर्याचे विहंगम दर्शन घडते. व संपूर्ण सापुताराचे सुंदर निसर्गरम्य दृश्य पाहता येत़े. स्थानिक आदिवासींच्या इतिहासाचे दर्शन घडवणारे म्युझियमदेखील बघण्यासारखे आह़े. रोप वेने सापुताऱ्याच्या एका कडय़ावरून दुस-या कडय़ावरचा प्रवास चित्तथरारक वाटतो़. तर ट्रेकर्ससाठी खास बांबू लाइंड पाथ-वे बनवण्यात आले आहेत़.
सापुतारामध्ये जेवणाचे उत्तम पर्याय उपलब्ध असून गुजराती पंचपक्वान्नासह आदिवासी पद्धतीच्या जेवणाचादेखील आनंद घेता येतो़.  त्यासाठी इथे फूड कोर्टदेखील तयार करण्यात आले आह़े.
सापुतारा हे हिल स्टेशन महाराष्ट्र राज्याच्या नाशिक शहरापासून सुमारे ८० किमी़ अंतरावर आह़े  यासाठी राज्य मार्ग क्ऱ १७ (दिंडोरी रस्ता)ने राज्य मार्ग क्ऱ २३ पर्यंत जाऊन, इतर मार्गाने सापुताऱ्यापर्यंत जाता येत़े.  मुंबई अथवा अहमदाबाद येथून रेल्वेने बिलिमोरी स्थानकापर्यंत जाऊन, तेथून बस अथवा टॅक्सीने हिल स्टेशनला जाता येत़े  ल्ल
बघण्यासारखे ठिकाण: सापुतारा लेक- हथगढ किल्ला-कलाकारांचे खेडे (आर्टिस्ट व्हीलेज)- मधसंकलन केंद्र- मिरा धबधबा- रोप-वे ौ बोटिंग क्लब- म्युझियम- सनराइज पॉइंट- जवळील रेल्वे स्टेशन-
बिलिमोरा-१७२ किमी, नाशिक शहरापासून सुमारे ८० किमी, मुंबई शहरापासून सुमारे १८५ किमी, सुरत शहरापासून सुमारे १७२ किमी

(THIS ARTICLE IS PUBLISHED IN JUNE-2013 ISSUE OF  ’YUVA’ MAGAZINE OF RANE PUBLICATION)

Pratik Mukane

Pratik Mukane

Pratik Mukane is an engaging journalist with a strong presence and a passion for writing and constantly chasing breaking news. He enjoys meeting new people, telling meaningful stories and having a few cups of coffee in between!

Leave a Response

share on: