वील यू बी माय व्हॅलेंटाईन..

share on:

वर्षातील प्रत्येक दिवस हा सारखाच असतो. पण प्रत्येक वर्षातील ‘तो’ एक दिवस खूप खास असतो. ज्या प्रमाणे ‘चतक’ हा पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघत असतो, तितक्याच आतुरतेने तरूण वर्ग ‘त्या’ दिवसाची वाट बघत असतो. अर्थात तो दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’.

एका हातात ग्रिटिंग कार्ड आणि गिफ्ट तर दुस-या हातात फुलांचा गुच्छा घेऊन – एकमेकांना आवडणारे मुलं-मुली त्या दिवशी एकत्र भेटतात, हृदयाची धाकधूक वाढत असते, आनंद देखील वाटत असतो आणि भीती सुध्दा-  तितक्यात दोघांपैकी कोणीतरी एकजण मोठ्या हिंमतीने म्हणतं – डिअर, मला तुला काहितरी सांगायचे आहे… ‘आय लव्ह यू- वील यू बी माय वॅलेंटाईन’? आणि तिथूनच सुरूवात होते ती एका गोड नात्याला.

एकोणिसाव्या शतकापर्यंत ‘वॅलेन्टाईन डे’चे महत्त्व हे केवळ ‘रोमॅंटिक’ जोडप्यांपूर्तीच मर्यादित होते. प्रेमी युगल तो दिवस आपल्या जोडीदारास प्रेम पत्र, कविता किंवा भेट वस्तू देऊन साजरा करायचे. मात्र, विसाव्या षतकात ‘वॅलेन्टाईन डे’ ने अन्नय साधारण महत्त्व प्राप्त केले, आणि ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला प्रफुल्लित केले, त्या सर्वांच्या प्रति असलेली प्रेम-भावना व्यक्त करून हा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली.

‘वॅलेन्टाईन डे’ हा केवळ प्रेमी युगलांचा दिवस राहिला नसून तो एका ‘गोड नाते-संबंध’ साजरा करण्याचा सण झाला आहे. पूर्वी केवळ प्रियकर आणि प्रेमिका एकमेकांना ‘वॅलेन्टाईन डे’च्या शुभेच्छा द्यायचे. मात्र आज, मित्र, मैत्रिणी, पालक, भाऊ-बहिण, शिक्षक किंबहुना, ज्याकोणी व्यक्ती आपल्यासाठी विशेष आहेत, त्या सर्वांसोबत हा दिवस साजरा केला जात आहे.

प्रेम हे केवाही आणि कोणत्याही स्वरूपात व्यक्त केले जावू शकते. त्यासाठी एखादा विशिष्ट दिवस असला पाहिजे असे काही नाही. परंतु इतर दिवसांच्या तुलनेत ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या दिवशी  आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचे आणि ते स्विकारण्याचे महत्त्व हे आजच्या पिढीसाठी खूप वेगळे आहे.

सुंदर हस्ताक्षराने बांधली त्यांच्या आयुष्याची गाठ

ते दोघेही शेजारी होते. मात्र, ते एकमेकांशी बोलत नव्हते. त्यावेळेस सागर हा थ्रिडी फिल्म अ‍ॅनिमेशनमध्ये डिप्लोमा करत होता. तर रोशनी नोकरी करत होती. प्रत्येकाच्या मनात आपल्या आयुष्यातील भावी जोडीदाराबाबत काहीना काही कल्पना असतात. तशाच काही कल्पना रोशनीच्या मनात देखील होत्या. रोशनीला आपला जोडीदार हा उंच, धिप्पाड असा मुलगा हवा होता. परंतु सागर अगदी त्या विरूध्द शरीरयष्टीचा होता. तर सागरला सोज्वळ आणि साधी मुलीगी हवी होती. पण रोशनी अगदी त्या विरूद्ध स्वभावाची आणि बिनधास्त होती. दरम्यानच्या काळात, सागरच्या वडिलांना प्रमोशन मिळाले. त्यामुळे त्यांनी आपल्या घरातील सामान त्याच कॉलनीतील दुस-या कॉटर्समधील मोठय़ा घरात हालविण्यास सुरूवात केली होती. पण सागरने काही महत्त्वाचे पेपर्स रोशनीच्या घरात ठेवले होते.अचानक रोशनीने ते पेपर्स बघितले आणि तिने तिच्या आईला विचारलं हे हस्ताक्षर कोणाचे आहे? ते सागरचे आहे हे तिला कळाले तेव्हा ती अचंबित झाली. त्यानंतर रोशनीनेच पुढाकार घेऊन त्याच्याची संवाद साधला व त्यानंतर त्यांचा एकमेकांशी घरोबा वाढला. त्यांची तीन वर्षाची मैत्री प्रेमात कधी बदलली हे त्यांना कळालेच नाही. ते दोघेही एकमेकांकडे आकर्षित होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

विशेष म्हणजे त्यांनी एक एकमेकांना कधीच प्रपोज केले नाही. त्या दोघांची परिस्थिती काहीशी ‘बातो बातो मै’ या हिंदी चित्रपटातील ‘ना बोले तुम ना मैने कुछ कहा, मगर ना जाने एैसा क्यू लगा, की धूप मे खिला चांद दिन मे रात हो गई, की प्यार के बिना कहे सुनी ही बात हो गई’, अशी झाली होती. मात्र, त्यांनी ‘व्हॅलेंटाईन’ डे कधी साजरा केला नाही. केवळ ‘व्हॅलेंटाईन’ आहे म्हणून आपल्या जोडीदाराला महत्त्व द्यायचे व इतर दिवशी प्रेमाला विषेश महत्त्व न देणे हे चुकीचे असून प्रेमात प्रत्येक क्षण हा ‘व्हॅलेंटाईन’ असतो अशा मताची रोशनी आहे. सागर हा बौध्द आणि रोशनी हिंदू असल्यामुळे सुरूवातीला त्यांच्या विवाहाला घरच्यांचा थोडा आक्षेप होता. मात्र, रोशनीच्या घरातल्यांना सांगर आवडत असल्यामुळे त्यांच्या लग्नाला मान्यता मिळाली व मोठय़ा थाटा-माठात १९ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचा विवाह झाला.

– रोशनी पवार (पालकर) आणि सागर पवार, सायन, मुंबई

बघता-बघता दोघेही पडले एकमेकांच्या प्रेमात

 
ते दोघेही एकाच महाविद्यालयात आणि एकाच वर्गात शिकत होते. त्यांची चांगली मैत्री झाली होती. तिचं दिसण, तिच्या चेहऱ्यावरचे हास्य त्याला खूप भावले. तिलाही तो आवडत होता. बघता-बघता ते दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि कधी प्रेमात पडले हे त्यांनाच कळाले नाही. स्वप्निल आणि सोनल यांनी एकमेकांना कधीच प्रपोज केले नाही, मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच, म्हणजे १४ फेब्रुवारी २००३ रोजी त्या दोघांनी रिलेशनशिप मध्ये अडकण्याचे ठरवले. विशेष म्हणजे, स्वप्निल त्यावेळेस जोषी-बेडेकर महाविद्यालयातला असा एकमेव विद्यार्थी होता ज्याची ‘लव्ह स्टोरी’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपासून ते प्रिंसिपलपर्यंत सगळयांना माहीत होती. महाविद्यालयातील स्टुडंट काउन्सिल व एनएसएसमध्ये स्वप्निल सक्रिय असल्यामुळे त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे जेव्हा-केव्हा वेळ मिळायचा, तेव्हा ते महाविद्यालयाच्या कॅंम्पसमधील शेडमध्ये भेटायचे व करिअर, शिक्षण आणि भविष्याबाबत चर्चा कराचे.

स्वप्निल आणि सोनले हे ‘व्हॅलेंटाईन डे’ जरी  साजरा करत नसले, तरी ते १४ फेब्रुवारी हा दिवस वेगळय़ा अर्थाने साजरा करतात, कारण ११ वर्षापूर्वी याच दिवशी ते खऱ्या अर्थाने एकमेकांच्या आयुष्यात आले होते. जशी  वर्षे सरत गेली तसे त्यांचे नाते देखील घट्ट होत गेले.

स्वप्निल आणि सोनल या दोघांचेही पालक समंजस असल्यामुळे, अंतरजातीय विवाहाला त्यांनी कधीच विरोध केला नाही. त्यामुळे २००३ सालापासून रिलेशनशिपमध्ये असलेले स्वप्निल आणि सोनल हे १ जानेवारी २०११ रोजी विवाहबध्द झाले. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.  लग्नाअगोदर १४ फब्रुवारीला ते दोघेही एकमेकांना गुलाबाची फुले, चॉकलेट्स द्यायचे. ठाण्यातील कचराळी परिसरात फेरफटका मारून संपूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवायचे. मात्र, या वर्षीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ स्वप्निल आणि सोनल या दोघांसाठी खास असणार आहे, स्वप्निल आणि सोनल हे दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ज्या जोषी-बेडेकर महाविद्यालयात त्याने पाच वर्षे घालवली, त्याच महाविद्यालयात तो नोकरी करत आहे. गेल्या अकारा वर्षापासून एकमेकांसोबत असलेल्या या जोडीसाठी प्रेम म्हणजे जीवन आहे.

– स्वप्निल मयेकर आणि सोनल मयेकर(मोरे), ठाणे

‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’

कनिष्ठ महाविद्यालयात ते दोघेही वाणिज्य शाखेत एकत्र शिकत होते. कॉलेजमध्ये असताना एका म्युचल फ्रेंडमुळे त्या दोघांची ओळख झाली. सौरभने जेव्हा पहिल्यांदा श्वेताला  पाहिल्या, त्याचवेळी तो तिच्या प्रेमात पडला. ओळख झाल्याच्या काही दिवसातच सौरभने तिला प्रपोज केल आणि श्वेताने त्याच्या प्रपोजलला दुजोरा दिला. त्यानंतर ते महाविद्यालयात भेटायचे व मुंबईत विविध ठिकाणी फिरायला जायचे. मात्र, गेल्या पाचवर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या सौरभ आणि श्वेताने   आजपर्यंत ‘व्हॅलेन्टाईन डे’ कधीच साजरा केला नाही. जर आपण ऐकमेकांवर प्रेम करतो तर वर्षातील एकच दिवस ‘व्हॅलेन्टाईन डे’ म्हणून का साजरा करायचा? आयुष्यातील प्रत्येक दिवस हा व्हॅलेन्टाईन डे सारखाच  असला पहिजे अशा मताचे ते दोघेही आहेत. अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असलेले सौरभ आणि श्वेता या दोघांनाही त्यांच्या घरच्यांनी सहकार्य केल्यामुळे ते नुकतेच विवाहबध्द झाले आहेत. आपल्या जोडीदाराने आपल्याला काहीही न सांगता ऐकमेकांच्या मनातील गोष्ट  ओळखणे म्हणजेच प्रेम असल्याचे दोघांनाही वाटते. विवाहनंतर सौरभ आणि  श्वेता यांना त्याचे वैवाहिक जीवन म्हणजे अविश्वश्निय स्वप्न साकार झाल्या सारखेच वाटत आहे. सौरभ आणि श्वेता हे दोघेही महाराष्ट्रिया कुटुंबातील आहेत. सौरभने हॉटेल मॅनेजमेंट केले असून त्याचा स्वतःचा ट्रॅव्हल-ट्यूरिझम व कॅटरिंगचा व्यावसाय आहे. तर श्वेताला एका खाजगी क्लासेसमध्ये काम करत आहे. या दोघांनीही त्यांच्या नवीन आयुष्याला सुरूवात केली असून येणारा काळ अधिकच सुखदायी असेल अशी आशा सौरभ आणि श्वेता करत आहेत.

आमच्यासाठी ‘वॅलेन्टाईन डे’ म्हणजे..

‘वॅलेन्टाईन डे’ साजरा करणे ही संकल्पना मला कधी भावली नाही. तुम्ही जर एखाद्या मुला-मुलीवर प्रेम करत असाल आणि तुमचे नाते-संबंध सुरळीत सुरू असेल, तर  भेटवस्तू दिल्याने किंवा सोबत राहिल्याने प्रेम व्यक्त होत नाही. प्रेम हे अनुभवायचे असते आणि ते आयुश्यभर जोपासायचे असते.

– अपूर्वा तुपदळे, ठाणे

या आधी ‘व्हॅलेनटाईन डे’ मी विषेश असा साजरा केलेला नाही. पण यावर्शीचा ‘व्हॅलेनटाईन डे’ माझयासाठी विषेश आहे. एकतर त्या दिवषी माझा भाऊ विवाहबध्द होत आहे. आणि दुसरे म्हणजे, मला संपूर्ण दिवस माझया आवडत्या व्यक्तीसोबत घालवण्याची संधी मिळणार आहे. त्या दिवषी काय करासचे, तो कसा साजरा कराचा, हे मी ठरवले असून त्याबाबत मी उत्साही आहे.

– प्रांजली गलगली, मुंबई

Pratik Mukane

Pratik Mukane

Pratik Mukane is an engaging journalist with a strong presence and a passion for writing and constantly chasing breaking news. He enjoys meeting new people, telling meaningful stories and having a few cups of coffee in between!

Leave a Response

share on: