ज्या प्रमाणे काळ बदलत चाललाय त्याच प्रमाणे आपल्या देशातील विवाह संस्कृती देखील बदलत चालली आहे. पूर्वी, घरातील वरिष्ठ सदस्यांच्या सहमतीनुसार त्यांनी सूचविलेल्या मुला-मुलीशी लग्न व्हायचे. विशेष म्हणजे त्यावेळी मुलगा, प्रामुख्याने मुलींना पालकांनी निवडलेल्या मुलाबाबत व ठरवलेल्या गोष्टींबाबत आक्षेप नसायचा. घरातील प्रमुख व्यक्तींनी सांगितलेल्या व्यक्तीशीच विवाह जुळून यायचा. परंतु काळाप्रमाणे आता लग्न ही संकल्पना आणि विवाह करण्याची पद्धत बदलत चालली आहे.
बदललेल्या काळाप्रमाणे आज-कालच्या तरूण तरूणींचा ओघ हा घरातल्या मंडळींनी ठरविलेल्या विवाहपेक्षा प्रेम विवाहाकडे जास्त असून त्यात मोठया प्रमाणात वाढ देखील होत आहे. विंâबहुना पहिले प्रेम आणि मग ‘अॅरेंज` विवाह करण्याची पद्धत जास्त रूजू लागली आहे. मात्र, जरी ही पद्धत रूजत चालली असली, तरी तितक्याच प्रमाणात प्रेम विवाहनंतर घटस्फोट घेण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे.
पूर्वी, ‘कुटुंब` ही लग्नामागची संकलपणा होती. त्यास समाजात एक विशिष्ट महत्त्व होते. उलट जर एखाद्याचे विवाह जुळत नसेल तर काहीतरी दोष आहे, असे समजले जायचे. परंतु आज ‘विवाह` म्हणजे केवळ एक ‘पॅâशन` बनली आहे. मुलगा-मुलगी आता केवळ आपल्या आवडीच्या जोडीदारासोबत संसार करण्याची इच्छा ठेवतात. आपल्या आवडत्या जोडीदारासोबत विवाह देखील करतात. मात्र, प्रेम विवाह खूप काळ टिकत नसल्याची व त्यामुळे होत असलेल्या घटस्फोटाची अनेक उदहारणे आपल्याला आजू-बाजुला बघायला मिळतात.
प्रेम करताना भावविश्वात मग्न असलेल्या प्रेमीकांमध्ये कुठल्याही प्रकारची विशेष जबाबदारी नसते. तसेच वारंवार भेटण्याची, छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्याची, प्रत्येक क्षणाचा आनंद लुटण्याची उत्वंâठा असते. परंतु जेव्हा त्याच पे्रम करणाNया जोडप्याचे लग्न झाले, की काही वर्षातच ‘त्या` प्रेमाची जागा दुरावा घेत जातो. विवाहच्या अगोदर प्रेमी युगल भावी आयुष्यातील जबाबदाNया संभाळण्यास तयार असतात. एकमेकांकडून विशेष काही अपेक्षा नसतात. परंतु, लग्नानंतर त्याच जबाबादNया पार पाडण्यावरून वाद निर्माण होतात. रोज घडणाNया लहान गोष्टींमधील आनंद कमी होत जातो, आणि घडणारी प्रत्येक गोष्ट ही सारखीच वाटू लागते.
विवाहाच्या काही कालावधीतच पती-पत्नीमध्ये विविध कारणांमुळे वाद निर्माण होतात. कधी एकमेकांना वेळ देता येत नसल्यामुळे तर कधी दोघांनाही एक मेकांचे म्हणजे ऐवूâण घ्यायचे नसते. त्यात पत्नी नोकरी करणारी असेल, तर तिच्या ऑफिसमधून येण्याच्या वेळेपासून ती कोणाशी बोलते, कोणाला भेटते या गोष्टींमुळे होणारे वाद हे प्रामुख्याने घटस्फोटाला कारणीभूत ठरतात.
प्रेम करताना कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता मुली संसार करण्यास तयार होतात व मुलाला देखील तिच्या कुठल्याही गोष्टीवर आक्षेप नसतो. मात्र, विवाहनंतर राहणीमान, घरातील वातावरण, राहण्याचे ठिकाण या गोष्टी मुलीला पटत नाहीत. तर विवाहनंतर सासरच्या कुटुंबियांनी लादलेल्या बंधनांमुळे मुलीला त्या परिस्थित राहणे जड जाते व वादाला एक नवी दिशा मिळते.
आपल्या देशातील साक्षरता जरी वाढत असली, तरी सामाजिकदृष्ट्या आपण अजूनही तेवढे पुढारलेलो नाहीत. आजही समाजात हुंडा मागितली जातो. मग तो प्रेम विवाह असो अथवा ‘अॅरेंज`. विवाह अगोदर अनेक मुलींना स्वर्गातील अप्सरेप्रमाणे ठेवण्याचे स्वप्न दाखवले जाते. परंतु तसे होत नाही आणि तिच्याकडून वारंवार हुंडा मागितला जातो. यासाठी तिचा शाररिक व मानसिक छळ देखील होते. अनेक मुली, परिस्थिती अभावी तो सहन देखील करतात. परंतु कनखर आणि या गोष्टीच्या विरोधात असलेल्या मुली या जाचाला वंâटाळून अखेर घटस्फोट घेतात.
एखादी गोष्ट समजून घेण्यापेक्षा, दोघांपैकी कुणीतरी एक पाऊल मागे टाकण्यापेक्षा लहान-लहान गोष्टी तानल्या जातात. समजूतदारपणा दाखवून विषय मिटविण्यापेक्षा आपलेच म्हणे खरे आहे, हे पटवून देण्यात अध्र्यापेक्षा अधिक वेळा वाया घालवला जातो. विवाहनंतर ‘चर्चा` हा विषयच उरत नाही. विवाह आगोदर अनावश्यक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी वेळच वेळ असतो. मात्र, विवाहनंतर आवश्यक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी तोच वेळ शोधावा लागतो. मुल जन्माला आलं की आपआपल्या कामांमुळे वेळ देणे दोघांनाही शक्य होत नाही. आर्थिक व नैतिक जबाबदा-या वाढतात आणि वाद निर्माण होतात. दोघांमध्ये असलेल्या विश्वासाला नकळत तडा जातो आणि अखेर रोजच्या व्यापाला वंâटाळून उपाय म्हणून दोघेही घटस्फोटाचा मार्ग स्विकारतात. परंतु जेव्हा चुकलेल्या गोष्टी सुधारण्यासाठे पाऊल उचलले जाते, तोपर्यंत हातातून वेळ निघून गेलेली असते.
(This article was published in Jan Pravah Magazine)
info@pratikmukane.com