कालरंग दिवाळी अंक २०२१

share on:

गेल्या दीडवर्षापासून ‘कोरोना’ महामारीचा सामनाकरीत संपूर्ण जग आपली घौडदौड सुरु ठेवत आहे. दुसऱ्यालाटेनंर भारतातील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अर्थात, तिसऱ्यालाटेचा धोका अजूनही टळलेला नाही. महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे कोलमडलेले अर्थकारण, छोटे-मोठे व्यवसाय, गृहउद्योग, हातावर पोट असणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दुसऱ्यालाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे आरोग्य व्यवस्था, रुग्णालये, अल्पदरात गरिबांसाठी आरोग्यसेवा या गोष्टींवर अधिकभर देण्याची नितांत गरज अधोरेखित झाली आहे.

कोरोनाचा फटका अनेक क्षेत्रांना बसला. त्यामध्ये वृत्तपत्र, माध्यमांचादेखील समावेश आहे. उत्तम साहित्य आणि वाचकांबरोबर, दिवाळी अंकांसाठी जाहिराती खूप महत्वाच्या असतात आणि आपण दिलेल्या सहकार्यामुळे कालरंग दिवाळी अंक २०२१ आपल्या समोर सादर करताना आनंद होत आहे. या वर्षीदेखील उत्कुष्ट लेख, कथा, कविता, वार्षिक भविष्य असे दर्जेदार, कलात्मक साहित्य आपल्याला वाचायला मिळेल.

प्रशांत दयानंद मुकणे - संपादक
Pratik Mukane

Pratik Mukane

is an engaging journalist with a strong passion for writing and constantly chasing breaking news. With over 12 years of experience, he writes on politics, current affairs, social issues, and a bit of everything. Currently, he is working with The Times of India. Based in Mumbai, the financial capital of India, he enjoys telling meaningful stories.

Leave a Response

share on: