बाजारातील वाढत्या स्पर्धेमुळे दर्जेदार आणि प्रसिद्ध कंपन्यांचे स्र्माटफोनदेखील कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे ‘ईएमआय’च्या पर्यायामुळे स्मार्टफोन खरेदी करणेदेखील अगदी सोपे झाले आहे. पण स्मार्टफोन स्लो किंवा हँग झाला, अँप्लिकेशन सुरू होताना अडथळे निर्माण झाले तर काय करायचे, हा प्रश्न तुम्हालादेखील पडत असेल. म्हणूनच अँन्ड्रॉइड आणि आयफोन वापरणार्यांसाठी खास ‘स्मार्टफोन ट्रबलशूटर’…
अँन्ड्रॉइड
आयफोनप्रमाणेच, अनेकदा केवळ तुमचा ‘अँन्ड्रॉइड’ फोन रीस्टार्ट केल्याने तुम्ही तुमच्या फोनमधील छोटा प्रॉब्लेम सोडवू शकता. परंतु फोन रीस्टार्ट करूनदेखील तुमच्या फोनमधील प्रॉब्लेम तसाच राहिला किंवा तुमचा फोन काम करीत नसेल, तर तुमच्या फोनची बॅटरी काही मिनिटांसाठी बाजूला काढून ठेवा आणि बॅटरी पुन्हा टाकून फोन रीस्टार्ट करा. तरीदेखील तुच्या फोनमधील समस्या तशीच असली, तर तुमच्या फोनमधील Settings > Backup & reset > Factory data reset > Reset phone पर्याय निवडून तो मूळ पदावर आणू शकता. मोबाइल बनवणारी प्रत्येक कंपनी आपापल्या पद्धतीने मोबाइल इंटरफेस बनवते. त्यामुळे काही अँन्ड्रॉइड फोनमध्ये मोबाइल रीसेट करण्यासाठी settings > Privacy > Factory data reset द्वारे फोन रीसेट करावा लागतो. जर तुमचा फोन व्यवस्थित चालत नसेल, वारंवार बंद-सुरू होत असेल आणि सॉटवेअर रीसेट होत नसेल, तर तुम्ही हार्ड रीसेट करू शकता. यासाठी Volume Up + Power + Home button किंवा Volume Down + Power button काही वेळासाठी दाबून ठेवा.
कॉन्टॅक्ट, मेसेज आणि अँप्लिकेशन बॅक अप
गुगल क्लाऊ डद्वारे बॅक अप:
गुगल सर्व्हरवर अँप्लिकेशन सेटिंग, वायफाय पासवर्ड, कॉन्टॅक्ट इत्यादीचे बॅकअप घेण्यासाठी Settings > Backup & reset > Back up my dataa हे पर्याय निवडून बॅक अप घ्या. Settings > Accounts > Google मध्ये जाऊन गुगल अकाउंटद्वारे ज्या गोष्टींचे बॅक अप घ्यायचे आहे, तो पर्याय निवडून बॅक अप घेता येतो. विशेष म्हणजे जर तुम्ही गुगल अकाउंटमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह केले असतील, तर तुम्ही अँन्ड्रॉइड, विंडोज फोन, बीबी10 आणि आयओएस डिव्हाइसमध्येदेखील बॅक अप घेऊ शकता. जर तुम्ही गुगल प्लस तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केले असेल, तर तुम्ही काढत असलेले सर्व इमेजेस ऑटो अपलोड होतात.
‘सॅमसंग’ आणि ‘एचटीसी’मध्ये काईज आणि सिंक मॅनेजर यासारखे फीचर्स असून, हे अँप्लिकेशन तुम्ही त्यांच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता.
आयफोन
डिझाइन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सुरक्षेसाठी अॅपल कंपनीचा ‘आयफोन’ बाजारात प्रसिद्ध आहे. परंतु कधी कधी अॅप्लिकेशन क्रॅश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रमाणापेक्षा जास्त अँप्लिकेशन्स डाऊ नलोड केल्यामुळे मोबाइल हँग होतो आणि त्याचा परिणाम मोबाइलच्या स्पीडवर होतो. अशा वेळी काही प्रमाणात अडथळा दूर करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाइल रीस्टार्ट करून प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. त्यासाठी ‘पॉवर’ स्विच काही वेळासाठी दाबून ठेवा व स्क्रीनवर दिसणार्या ‘स्लाइट-टू-पॉवर-ऑफ’द्वारे फोन रीस्टार्ट करा. पण जर अडथळा दूर झाला नाही तर हँडसेटमधील सेटिंग पर्याय निवडून (Settings > General > Reset) फॅक्टरी सेटिंग रिसेट करा. जर तुमचा फोन वारंवार रीस्टार्ट होत असेल, तर मोबाइलमधील डेटा स्वाइप करून सेटिंग पूर्ववत केल्यास अडथळा दूर होण्यास मदत होऊ शकते. जर फोन फक्त हँग होत असेल, तर रिबूट करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी ‘पॉवर’ आणि ‘होम’ बटण एकाच वेळी १0 ते १५ सेकंद दाबून धरा. त्यानंतर स्क्रीनवर ‘अँपल’चा लोगो आला तर तुमचा फोन रिबूट झाला आहे, असे समजा.
मेसेज, कॉन्टॅक्ट्स आणि अँप्लिकेशन्सचे बॅकअप
आय क्लाऊडद्वारे फोनचा बॅक अप : आयफोनमध्ये असलेला डेटा बॅकअप घेण्यासाठी तुम्ही ‘आय क्लाऊ ड’ या सर्व्हिसचा उपयोग करू शकता. Settings > iCloud > Storage and Backup हा पर्याय निवडून तुम्ही अँपलच्या सर्व्हरवर कॉन्टॅक्ट, अँप्लिकेशन सेटिंग्ज, मेसेज आणि इमेजेस यांचा बॅकअप घेऊ शकता. किंवा Storage and Backup > Backup Now पर्याय निवडून देखील बॅक-अप घेता येतो.
बॅकअप आयट्युन्सद्वारे : आयट्युन्सद्वारे फोनचा बॅकअप घेण्यासाठी ज्या पीसीमध्ये आयट्युन इन्स्टॉल आहे त्या कॉम्प्युटरसोबत तुमचा आयफोन कनेक्ट करा. एकदा तुमचा फोन कनेक्ट झाला, की आयट्युन्समधील आयफोन हा पर्याय निवडून बॅक अप ऑप्शन सीलेक्ट करा.
तुमच्या फोनमधील डेटा रीस्टोअर कसा कराल?
जर तुम्ही नवीन आयफोन घेतला असेल किंवा फॅक्टरी सेटिंग रीसेट करण्याआधी तुमच्या फोनमध्ये असलेला डेटा रीस्टोअर करण्यासाठी तुम्हाला तीन पर्याय दिले जातात.
1) नवीन आयाफोन सेटअप
2) आय- क्लाऊडद्वारे रीस्टोअर (त्यासाठी वायफाय असणे आवश्यक आहे.)
3) आयट्युन्स बॅकअपद्वारे रीस्टोअर करणे (त्यासाठी डेटा केबलद्वारे तुमचा फोन कॉम्प्युटरला कनेक्ट करणे गरजेचे आहे.)