स्मार्टनेस बॅटरीच्या आयुष्याचे!
स्मार्टफोन खरेदी केला की त्याची बॅटरी खूप काळ टिकत नाही, अशी बोंब आपण नेहमीच मारत असतो. पण जर तुम्ही आयफोन फोर, फोर एस, फाइव्ह, फाइव्ह एस किंवा फाइव्ह सी वापरत असाल आणि तुमच्या फोनची बॅटरी खूप लवकर संपत असेल, तर या काही ट्रिक्स नक्की वापरून पाहा. तुमच्या फोनद्वारे मिळणार्या बॅटरी बॅक अपमधील फरक नक्की जाणवेल.
[facebook][retweet]
बॅकग्राउंड अँप रीफ्रेश
बॅकग्राउंड अँप रीफ्रेश – या नवीन फीचरमुळे आवश्यक असलेले अँप्स स्क्रीनवरून अदृश्य (मीनिमाइज) केलेले असतानादेखील ते रीफ्रेश होत राहतात. यामुळे मल्टीटास्किंग सोपे होत असले तरी बॅटरी लवकर संपते. म्हणून, आवश्यकता नसल्यास हे फीचर डिसएबल करावे. यासाठी Settings > General > Background App Refresh याद्वारे तुम्ही संपूर्ण फीचर किंवा जे अँप्स रिफ्रेश करायचे नसतील ते डिसएबल करू शकता.
लोकेशन ट्रॅकिंग अँप
गुगल अँप्स, ट्विटर, फेसबुक, आयओएस कॅमेरा यासारखे अँप्लिकेशन्स तुमचे लोकेशन ट्रॅक करत असतात. अशा वेळी तुम्ही हा पर्याय बंद केल्यास बॅटरी अधिक वेळ साथ देऊ शकते. यासाठी (Settings > Privacy > Location) या पर्यायाद्वारे संपूर्ण लोकेशन ट्रॅकिंग किंवा ठरावीक अँप्स तुम्ही बंद करू शकता.
पॅरालॅक्स – रिड्यूस मोशन
आयओएस-७मध्ये अँपलने बरेच नवीन अँनिमेशन आणि वस्तुस्थलभेद फीचर्स दिले आहेत. परंतु यामुळे फोनमधील बॅटरी लवकर संपते. त्यामुळे Settings > General > Accessibility and click Reduce Motion to “on.”. या पर्यायाद्वारे तुम्ही पॅरालॅक्स – रिड्यूस मोशन ऑन करू शकता.
ऑटोमॅटिक अपडेटिंग
एखादे अँप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्या अँप्लिकेशनचे अपडेटेड व्हर्जन अँप्स स्टोअरमध्ये वारंवार उपलब्ध होत असतात. पण आवश्यकता नसतानादेखील अनेक अँप्स (उदा. फेसबुक, ट्विटर) आपोआप अपडेट होतात. हे अँप्लिकेशन स्मार्ट आहे. मात्र, बॅटरीमधील पॉवर कमी असताना अँप्लिकेशनचे ऑटोमॅटिक अपडेट सुरू झाल्यास बॅटरीतील पॉवर अधिक लवकर संपते. त्यामुळे हा पर्याय शक्यतो बंद ठेवावा. ऑटोमॅटिक अपडेट बंद करण्यासाठी visit Settings > iTunes and Apple Store and uncheck the Updates. हे पर्याय निवडा
टर्न ऑफ एअर ड्रॉप
एकाच नेटवर्कवर असलेल्या युर्जससोबत फायली शेअर करणे एअर ड्रॉपमुळे शक्य होते. परंतु जेव्हा गरज नसेल, तेव्हा हा पर्याय बंद करावा.
ब्राइटनेस कमी करा
बॅटरीमधील पॉवर अधिक काळ टिकून राहावी यासाठी ब्राइटनेस कमी केल्यास त्याचा फायदा होत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. आयओएस-७ देखील याला अपवाद नाही. ब्राइटनेस कमी करण्यासाठी Control Center or visit Settings > Wallpapers & Brightness and disable Auto-Brightness and decrease the setting manually. या पर्यायांचा वापर करावा
स्पॉट लाइट
अँपल डिवाइसमधील अंतर्गत सर्च पर्यायाला स्पॉट लाइट म्हणतात. हा पर्याय तुमच्या स्क्रीनवरूनदेखील अँक्सेस करता येतो. परंतु यामध्ये प्रत्येक वेळेस नवीन डेटा दाखवला जातो. त्यामुळे बॅटरी अधिक लवकर संपते. Check out Settings > General > Spotlight Search and disable या पर्यायांचा वापर करून इव्हेंट आणि पॉडकास्ट यासारखे पर्याय डिसएबल करू शकता.