कमाल गॅलेक्सीची

share on:

अद्ययावत आणि स्मार्ट तरुणाईसाठी गॅलेक्सी एस फोर हे मॉडेल सोबत असेल तर व्यक्तिमत्व झकास बनू शकते. 

स्मार्टफोनमध्ये बेंचमार्क ठरलेल्या ‘एस-३’ मॉडेलच्या घवघवित यशानंतर सॅमसंग कंपनी ‘गॅलेक्सी एस-४’ हे नवीन मॉडेल बाजारात घेऊन येत आहे. ‘एस-३’च्या तुलनेत ‘गॅलेक्सी एस-४’ हे मॉडेल कसे असणार आहे, त्यामध्ये कोणत्या नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे, ‘एस-४’मध्ये असलेले स्पेसिफिकेशन, याचा टीम युवाने घेतलेला हा आढावा.

‘स्मार्ट फोन’ म्हटले की पहिले नाव डोळय़ासमोर येते ते ‘सॅमसंग’ या मोबाईल कंपनीचे. ‘एस-३’ या स्मार्टफोनच्या भरघोस यशानंतर सॅमसंग आता ‘गॅलेक्सी एस-४’  हे नवीन मॉडेल बाजारात घेऊन येत आहे. मोठी स्क्रीन, उत्कृष्ट फिचर्स आणि अ‍ॅन्ड्रॉईड जेली बिन ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या ‘एस-४’ या स्मार्टफोन मॉडेलचे सॅमसंगने नुकतेच न्यूयॉर्क येथे आनावरण केले. भारतात हे मॉडेल एप्रिल महिन्याच्या अखेपर्यंत दाखल होणार आहे.

‘एस-४’ हा फोन आकाराने थोडा लहान असला तरी त्याच्या स्क्रीनची साईज ‘एस-३’ या मॉडेलपेक्षा मोठी देण्यात आली आहे. पाच इंच स्क्रीन साईज असलेला हा जगातील पहिला फोन असल्याचा दावा कंपनीने केला असून त्याचे स्क्रीन रेझोल्युशन १०८० पिक्सेल इतके आहे. ‘एस-४’च्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मध्ये देखील थोडाफार बदल करण्यात आला आहे. ‘एस-४’ हा फोन वजनाला हलका असून त्याचे वजन केवळ १३० ग्रॅम आहे. तर आकाराला ०.७ एमएम इतक बारीक आहे. ‘एस-३’च्या तुलनेत ‘एस-४’ या मॉडेलमध्ये १३ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

‘एस-३’ प्रमाणेच ‘एस-४’ चे प्रोसेसर दोन वेगळय़ा व्हर्जन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. ‘एस-४’च्या एका मॉडेलमध्ये 1.9GHz quad-core Qualcomm स्नॅपड्रॅगन ६०० सिरीज प्रोसेसर आणि दुसरे मॉडेलमध्ये 1.6GHz eight-core Exynos 5 ऑक्टा सिलिकॉन प्रोसेसर असणार आहे. तर भारतात उपलब्ध होणा-या मॉडेलमध्ये Exynos 5 ऑक्टा सिलिकॉन हा प्रोसेसर असेल.

‘गॅलेक्सी एस-४’मध्ये २जीबी रॅम देण्यात आली असून ६४ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. तसेच एक्स्टर्नल मेमरी १६-३२-६४ जीबी कार्डद्वारे वाढवली जाऊ शकते.

भारतात ‘एस-४’ हे मॉडेल ४२ हजार ते ४५ हजार या किंमतीत उपलब्ध होणार आहे. ‘ट्रेड्स’ यांसारख्या काही ऑनलाईन साईट्सवर या हॅन्डसेटसाठी बुकिंग सुरू असून ९९९ रूपये भरून हे मॉडेलची ऑर्डर देता येवू शकते.

गॅलेक्सी ‘एस-4’च्या काही महत्त्वपूर्ण बाबी

डिस्प्ले:    ४.९९’’ १६-एम कलर सुपर एएमओ-लेड एचडी कॅपेसिटिव्ह टच स्क्रीन

ऑपरेटिंग सिस्टम: अ‍ॅनड्रॉईड व्ही४.२.२ (जेली बीन)

प्रोसेसर:  १.६ गिगाहाड्ज क्वॅड-कोर एआरएम कोरटेक्स-ए१५ आणि १.२ गिगाहाड्ज क्वॅड-कोर एआरएम कोरटेक्स-ए७ /१.९ गिगाहाड्ज Rाएट ३००

रॅम:    २ जीबी

मेमरी:    इंटरनल स्टोरेज १६/३२/६४ जीबी (मायRो एसडी कार्ड -६४ जीबी पर्यंत)

कॅमेरा:    १३ मेगा फिक्सल ऑटो फोकस; २ मेगापिक्सल  फ्रंट फेसिंग कॅमेरा. फेस डिटेक्शन, डबल चॅट फिचर्स, फ्लॅश, बीआयएस सेन्सर

व्हिडियो:   एचडी (१०८० पिक्सल)

आकार:    १३६.७ ३ ६९.९ ३ एमएम, १८० ग्राम

नेटवर्क:    ३जी/४जी क्वॅड बॅन्ड जीएसएम/जीपीआरएस/एड्ज; क्वॅड-बॅन्ड एचएसपीए

कनेक्टीव्हिटी:    व्हायफाय/वायफाय हॉट  स्फॉट/ब्ल्यूथूत ४.०, मायक्रो युएसबी, जीपीएस रिसिव्हर, इन्फ्रारेड पोर्ट.

Pratik Mukane

Pratik Mukane

is an engaging journalist with a strong passion for writing and constantly chasing breaking news. With over 12 years of experience, he writes on politics, current affairs, social issues, and a bit of everything. Currently, he is working with The Times of India. Based in Mumbai, the financial capital of India, he enjoys telling meaningful stories.

Leave a Response

share on: