फक्त एण्टरटेण्मेंट

share on:
नाटक, मालिका आणि चित्रपटांमधील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून भरत जाधव प्रसिध्द आहेत. ‘सही रे सही’ या नाटकाद्वारे महाराष्ट्रातील तमाम बांधवांच्या मनात आपले नाव कोरणारे भरत जाधव आता निर्मिती क्षेत्रात उतरले असून नवी इनिंग खेळायला सज्ज झाले आहेत. भारत जाधव यांच्याशी त्यांच्या अभिनेता ते निर्माता या प्रवासाविषयी मारलेल्या गप्पा…

[facebook]

27 वर्षांच्या प्रवासात 8,500 नाटकं, 85 मराठी चित्रपट आणि 8 मालिकांमध्ये केलंय काम
launchमराठी मनोरंजन विश्वात आपला ठसा उमटवणारे भरत जाधव यांनी एक पाऊल पुढे टाकत निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. एण्टरटेण्मेंट इंडस्ट्रीमधील सर्व बाबींशी एकरूप असलेले भरत जाधव आता आपला 27 वर्षांचा अनुभव निर्मिती क्षेत्रात वापरणार असून ‘भरत जाधव एण्टरटेण्मेंट’ या कंपनीची त्यांनी नुकतीच घोषणा केली. तर या संकेतस्थळाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी सरिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रपटसृष्टीला समृध्द करण्याचा हेतू मनात ठेवून भरत जाधव यांनी एण्टरटेण्मेंट कंपनीची स्थापना केली आहे. ‘भरत जाधव एण्टरटेण्मेंट’ ही कंपनी मराठी चित्रपट आणि मालिकांची निर्मिती करणार असून देश-विदेशात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. प्रथमच मराठी मनोरंजन क्षेत्रात नवोदीत कलाकारांना विनामुल्य सुरक्षित ऑनलाईन प्रोफाईल या वेबसाईटवर बनविता येणार असून फोटो, व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर मराठी मनोरंजन क्षेत्रातील निर्माते दिग्दर्शक, निर्मिती संस्था आणि नव्या कलाकारांना संधी देण्यासाठी ही वेबसाईट कार्यरत असणार आहे. आगामी काळात या वेबसाईटद्वारे ऑनलाईन शॅपिंगची आणि चित्रपटांचे बुकिंग करण्याची सोय देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील मराठी उद्योजक विकास कोरे यांच्या बिझकॉट सोल्यूशन या कंपनीच्या माध्यमातून ही वेबसाईट तयार करण्यात आली असून कोरे यांची कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ‘मिडिया-वन’ या जनसंपर्क संस्थेचे गणेश गारगोटे प्रसिध्दी आणि मार्केटिंगची धुरा सांभाळणार आहेत. ‘‘ परदेशात कार्यरत असताना अनेकजण मराठी चित्रपट, इव्हेंटस् यांच्या निर्मितीविषयी विचारणा करतात, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे निर्मितीविषयी उत्सुक असलेल्या लोकांपर्यंत आणि परदेशातील मराठी बांधवांपर्यंत दर्जेदार कलाकृती पोहोचविण्याचे काम ही कंपनी करेल’’, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विकास कोरे यांनी सांगितले.
सन 1985 साली सुरू झालेल्या नाट्य-सिने सृष्टीतल्या तुमच्या प्रवासाला जवळपास 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. काय सांगाल तुमच्या संपूर्ण प्रवासाबाबत?
नाट्य-सिने सृष्टीतील आतापर्यंतचा प्रवास चांगलाच झाला आहे. स्ट्रगल नक्कीच आहे. स्ट्रगल नसतं तर एवढा प्रवास घडला नसता, व त्यातून बरंच काही कळालं. त्यामुळेच आज bharatjadhaventertainmnet ही कंपनी सुरू केली आहे.
bharatjadhaventertainmnet.com या संकेतस्थळाबाबत काय सांगाल?
चित्रपट सृष्टीत नवीन आलेल्या लोकांना, लेखकांना, कलाकारांना याद्वारे एक प्लॅटफॉर्म  उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. अनेक वेळा आपल्याला एखाद्यामध्ये असलेलं टॅलेन्ट कळत नाही. पण जर एखाद्याकडे खरंच टॅलेन्ट असेल, तर bharatjadhaventertainmnet.com या वेबसाईटद्वारे त्याला त्याचे टॅलेन्ट जगासमोर मांडता येईल. तसेच या वेबसाईटवर माझ्या स्वतःच्या चित्रपटांचे प्रमोशन होईल, पण त्याचबरोबर इतरांच्या चित्रपटांचे देखील प्रमोशन विनामुल्य केलं जाईल.
भरत जाधव एण्टरटेण्मेंट ही वेबसाईट सुरू करण्यचा संकल्प कसा केला?
माझा मित्र विकास कोरे यांच्या डोक्यातील ही कल्पना आहे. तीन-चार वर्षांपूर्वी त्यांनी bharatjadhav.com हे माझे संकेतस्थळ सुरू केले होते. त्या संकेतस्थळाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. जगभरातील विविध क्षेत्रातील मराठी लोक मला अॅप्रोच होवू लागले. त्यामुळे मला चांगले फॉलोअर्स मिळाले. मी काय करावं आणि काय करू नये, यावर चर्चा होवू लागली. मग आपली कंपनी असावी, असे वाटले. पण नुसती कंपनी असून उपयोग नाही. त्याच बरोबर इतरांनी न केलेल्या नवीन गोष्टी करू शकतो का? हा विचार मनात आला आणि त्यातूनच साकर होत असलेला हा एक प्रयत्न.
मराठी चित्रपट सृष्टीत तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. मग कंपनी सुरू करण्याचा निर्णय का घेतला? हा निर्णय या आधी का नाही घेतला?
मी निर्माता होईल, अशी माजी मानसिकता कधीच नव्हती. कंपनी सुरू करायला एक ठराविक कालावधी लागतो. त्यायाठी तुम्ही अनुभवी असणं आवश्यक असतं. आज आपलं नाव झालंय म्हणून उद्या कंपनी कढली, असं होत नाही. ज्या क्षेत्रात तुम्ही कंपनी काढत आहात, त्या व्यावसायाची माहिती देखील व्हायला हवी. कंपनी सुरू केल्यानंतर आणखी चार गोष्टी होवू शकतात का? लोकांसाठी नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध होवू शकतो का? हा देखील विचार यातून आला, आणि मग त्यादृष्टीने पाऊल टाकले.
सध्या मराठी चित्रपटांची स्थिती कशी आहे, असे आपल्याला वाटते?
मराठी चित्रपट नक्कीच चांगल्या स्टेजला आहे. चांगल्या विषयांवर चित्रपट बनत आहेत. परंतु प्रेक्षक पहिल्या दिवशी सिनेमागृहात जावून चित्रपट बघत नाहीत. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रांगेत असल्यामुळे दुस-या किंवा तिस-या आठवढयामध्ये सिनेमागृहात नवीन चित्रपट दाखवला जातो. प्रदर्शित झालेला चित्रपट स्वतः न बघता, ज्यांनी तो बघितला आहे, त्यांना त्या चित्रपटाबाबत विचारून तो चित्रपट बघायचा की नाही, याबाबत प्रेक्षक निणर्य घेतात. पण असं करण्यापेक्षा प्रेक्षकांनी स्वतः चित्रपट बघून त्यावर विचार केला पाहिजे.
आपण चित्रपट क्षेत्रात काम करू शकत नाही, असे ग्रामीण भागातील लोकांना वाटते. त्यामुळे त्यांना तुमच्या कंपनीचा काही फायदा होईल का?
खरंतर, त्यांच्यासाठीच हा एक प्लॅटफॉर्म आहे. मी जेवढा सादा आहे, तेवढीच माझी कंपनी देखील साधी आहे. आज माझ्या मुंबई-पुण्यातील कार्यालयात सामान्य व्यक्ती जरी आली, तरीही मी त्या व्यक्तीचे स्वागत करणार. अर्थात त्याला माझ्या कंपनीमध्ये  काम मिळणार की नाही, हे त्याच्या टॅलेंटवर अवलंबून असेल. परंतु गरीब आणि श्रीमंत यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केले जाणार नाही. ज्याच्याकडे टॅलेंट आहे, त्याला संधी दिली जाईल. शेवटी तुमचा परफॉरमन्स तुम्हाला हिट किंवा फ्लॉप   करतो.
मी पोलिसाची भूमिका केली तर तुम्हाला आवडेल का? आणि मी रिअॅलिटी शो करावा का? असे प्रश्न तुम्ही काही महिन्यांपूर्वी तुमच्या वेबसाईटवर विचारले होते. रिअॅलिटी शो करावा, असे तुम्हाला का वाटते?
मी लोकांना चाचपण्याचा प्रयत्न करतो. लोकांना माझ्याकडून काय अपेक्षा आहेत, लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं, हे त्यातून कळतं. रिअॅलिटी शो बद्दल सांगायचे तर, माझ्या डोक्यात एक वेग्ळा रिअॅलिटी शो आहे. तो खूप गंमतीशीर असेल, पण त्याबाबत मी आता काही सांगणार नाही.
तुमच्या आगामी चित्रपटांबद्दल थोडेसे सांगा!
आता सतनागत हा चित्रपट येतोय. सतनागत हा गंभीर चित्रपट असून एका कादंबरीवर आधारीत आहे. 26 जुलैला श्रीमंत दामोदर पंत हा चित्रपट प्रदर्शित होईल, व त्यानंतर फेकमफाक हा चित्रपट देखील येतोय.

Leave a Response

share on: