देशातील इंटरनेट युजर्सची संख्या २० कोटी

share on:

 

माहिती आणि तंत्रज्ञानाचा होत असलेला प्रसार यामुळे भारतातील इंटरनेट युर्जसची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, हा आकडा आता २0 कोटींवर पोहोचला आहे. इंटरनेटचे जाळे १0 दशलक्षवरून १00 दशलक्षपर्यंत पोहोचण्यास एक दशकाहून अधिक काळ लागला. पण, अवघ्या तीन वर्षांत इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या १00 दशलक्षवरून २0५ दशलक्षांवर पोहोचली आहे. ऑक्टोबर २0१३ मध्ये इंटरनेट युर्जसची संख्या २0५ दशलक्ष इतकी होती; तर या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत हा आकडा २१३ दशलक्षवर पोहोचणे अपेक्षित आहे. इंटरनेट अँण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि आयएमआरबी इंटरनॅशनल यांनी तयार केलेल्या ‘आय-क्यूब २0१३’ या पाहणी अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. 
जुन 2013 मध्ये भारतात इंटरनेट युर्जसची संख्या १९0 दशलक्ष इतकी होती. त्यापैकी १३0 दशलक्ष युर्जस शहरी भारतात तर ६८ दशलक्ष युर्जस ग्रामिण भारतातील होते. ग्रामिण भारतात डिसेंबर २0१३पर्यंत हा आकडा ७२ दशलक्षपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा असून भारतातील इंटरनेटचा वापर करणार्‍यांच्या संख्येत ४0 टक्क्यांनी वाढ होताना दिसत आहे. भारतात सर्वाधिक इंटरनेट युर्जस (१२ दशलक्ष) मुंबईत असून, त्यापाठोपाठ दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगलूर, अहमदाबाद आणि पुणे या शहरांचा नंबर लागतो. ग्रामिण भागात  २६ दशलक्ष इंटरनेट युर्जस सक्रिय असून सर्वाधिक वापर (८७ टक्के) मनोरंजनासाठी केला जातो. तर शहरी भागत ४३.५ दशलक्ष इंटरनेट युर्जस सक्रिय असून सर्वाधिक वापर (७५ टक्के) सोशल नेटवर्र्किं गसाठी केला जातो. मात्र, संगणक उपलब्ध नसणे, इंटरनेटच्या माहितीचा अभाव आणि विजेचा अपुरा पुरवठा यामुळे ग्रामिण भागातील बहुतांश लोकांना आजही इंटरनेट वंचित आहेत. 
(Published in Lokmat newspaper on 18/11/2013)

internet3

Leave a Response

share on: