आयओएस VS अ‍ॅन्ड्रॉइड

share on:
अनेकदा आपण मोबाइल-टॅब्लेट घेताना अ‍ॅन्ड्रॉइड किंवा आयओएस मॉडेल घेण्याचा आग्रह धरतो. परंतु अ‍ॅन्ड्रॉइडऐवजी आयओएस व आयओएसऐवजी अ‍ॅन्ड्रॉइड घेतल्याने खरंच काही फरक पडतो का? कोणतेही मॉडेल घेतले तरी त्याचे फायदे आणि तोटे असणारच. पण जर २५ हजारांच्या महागड्या फोनमध्ये असलेली फंक्शन्स १0 हजारांच्या फोनमध्येच मिळणार असतील तर? जर अ‍ॅन्ड्रॉइड आणि आयओएस यापैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम निवडावी, या द्विधा अवस्थेत तुम्ही असाल तर या गोष्टींवर एकदा नक्की नजर टाका.

अ‍ॅप्लिकेशन्स
अ‍ॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या मोबाइल हॅन्डसेटमध्ये अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध होतात, ती गुगल प्लेद्वारे. सध्या गुगलप्लेमध्ये सुमारे १0 लाख अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी बहुतांश टॅब्लेटवर चालतात, तर किंडलसारखे काही अ‍ॅन्ड्रॉइड डिव्हाइस स्वतंत्र अ‍ॅपस्टोअर वापरतात. सुरुवातीला केवळ आयओएससाठीच असलेले इन्स्टाग्राम आणि पिन्टरेस्ट यासारखे अ‍ॅप्लिकेशन आता अ‍ॅन्ड्रॉइडवरदेखील उपलब्ध आहे. तसेच यू-ट्युब आणि गुगल डॉक्स यासारख्या अ‍ॅप्लिकेशन्सलादेखील अ‍ॅक्सेस मिळतो. तर अ‍ॅपल अ‍ॅपस्टोअरमध्ये आठ लाखांपेक्षा अधिक अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. त्यापैकी सुमारे २ लाख ५0 हजार केवळ आयपॅडसाठी उपलब्ध आहेत. अनेक डेव्हलपर्स अ‍ॅन्ड्रॉइडसाठी गेम्स तयार करण्याआधी ते आयफोनसाठी करतात. मात्र अ‍ॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेले अनेक अ‍ॅप्स आयओएसवरदेखील फ्री उपलब्ध आहेत.

सॉफ्टवेअर अपडेट
जरी गुगल अधूनमधून सॉफ्टवेअर अपडेट करीत असले तरी अपडेटेड सॉफ्टवेअर सर्व अ‍ॅन्ड्रॉइड हॅन्डसेटधारकांना उपलब्ध होतेच असं नाही. अनेक वेळा नवीन फोन विकत घेतल्यानंतर सुद्धा त्यामध्ये अपग्रेडेड सॉफ्टवेअर उपलब्ध होत नाही. तसेच नवीन व्हर्जन अनेक महिन्यांनंतर उपलब्ध होत असल्याने ज्यांच्याकडे जुने मॉडेल आहे त्यांना त्यासाठी वाट पाहवी लागते. मात्र अ‍ॅन्ड्रॉइडच्या तुलनेत आयओएस अपग्रेड एकाच वेळी सर्व डिव्हाइसेसमध्ये उपलब्ध होतात. नुकतेच अ‍ॅपलने ‘आयओएस-7’ व्हर्जन लाँच केले व ते सर्वांना एकाचवेळी उपलब्ध झाले.

डिव्हाइस सिलेक्शन
अ‍ॅन्ड्रॉइड डिव्हाइस मोठय़ा संख्येने बाजारात उपलब्ध आहेत. तेसुद्धा विविध आकारांत, किमतींत आणि हार्डवेअर कॅपेबिलिटिजसह. मात्र आयओएस फक्त आयफोन, आयपॅड टॅब्लेट आणि आयपॉड टच एमपी ३ प्लेअर या अ‍ॅपल डिव्हाइसवरच उपलब्ध आहेत. शिवाय अ‍ॅन्ड्रॉइडच्या तुलनेत अ‍ॅपल डिव्हाइस महाग असून, त्यांची संख्या खूप कमी आहे.

कॉल फीचर्स
जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात किंवा मीटिंगमध्ये असाल आणि आलेला फोन उचलायचा नसेल, तर केवळ टेक्स्ट मेसेजद्वारे रिप्लाय करण्याची सुविधा अ‍ॅन्ड्रॉइडमध्ये आहे. मात्र त्या तुलनेत आयोएसद्वारे मेसेज पाठवणे, कॉल रीमाइंडर व डू नॉट डिस्टर्बयारखे पर्याय दिले आहेत. कॉल रीमाइंडर तुम्हाला संबंधित कॉलची आठवण एका ठरावीक वेळेनंतर करून दिली जाते.

मेसेजिंग
इन्स्टंट मेसेजिंगसाठी अ‍ॅन्ड्रॉइडद्वारे जी-टॉकवर सहज लॉग इन करता येतं. परंतु आयओएस युर्जसना ही सुविधा मिळत नाही. त्यासाठी त्यांना आय-मेसेज वापरावे लागते.

वेब बाऊझिंग
अ‍ॅन्ड्रॉइड डिव्हाइसमध्ये गुगल क्रोम हे वेब ब्राऊझर उपलब्ध आहे, तर आयओएसमध्ये सफारी ब्राऊझर उपलब्ध आहे. पण जर तुम्हाला फेसबुक किंवा ट्विटरवर असलेली एखादी लिंक पाहायची असेल तर तुम्हाला ब्राऊझर निवडण्याचा पर्याय आयओएसमध्ये मिळतो.

मोबाइल पेमेंट
मोबाइल पेमेंटसाठी अ‍ॅन्ड्रॉइडमध्ये गुगल वॉलेट हे अ‍ॅप्लिकेशन देण्यात आले आहे, तर आयओएसमध्ये मोबाइल पेमेंटसाठी कोणतीही फीचर्स देण्यात आलेली नाहीत. मात्र पासबुक या अ‍ॅप्लिकेशनद्वारे रिवॉर्ड कार्ड, क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड यांची माहिती स्टोअर करता येते.

अ‍ॅप डेव्हलपिंग
अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप्स सी, सी ++ आणि जावा या प्रोग्रामिंगमध्ये बनवले जातात. अ‍ॅन्ड्रॉइड हे ओपन प्लॅटफॉर्म असून, अ‍ॅन्ड्रॉइड सोर्स कोड आणि अ‍ॅन्ड्रॉइड एसडीके कोड डाऊनलोड करू शकतात. तसेस अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप कोणीही फ्रीमध्ये बनवू शकतात व त्याचे वितरणदेखील करू शकतात. मात्र ज्या डेव्हलपर्सना गुगल प्लेवर आपले अ‍ॅप (फ्री किंवा पेड) पब्लिश करायचे आहेत त्यांना एकदाच नोंदणी करण्यासाठी साधारण २५ डॉलर इतके शुल्क भरावे लागते. तर आयओएस अ‍ॅप ‘ऑब्जेक्टिव्ह सी’मध्ये बनवले जातात. आयओएसवर अ‍ॅप्लिकेशन पब्लिश करण्यासाठी व आयओएस एसडीकेचा अ‍ॅक्सेस मिळविण्यासाठी डेव्हलपर्सना वार्षिक फी भरावी लागते.

आयओएस VS अ‍ॅन्ड्रॉइड

jpeg1 copy

Pratik Mukane

Pratik Mukane

Welcome to my digital portfolio. I am an engaging journalist with a strong passion for reporting and chasing breaking news. With over 10 years of experience in print and digital media, I cover topics related to politics, current affairs, social issues, technology, and a bit of everything. On this website, you can find samples of my news reports, blogs, and opinions published in various publications.

Leave a Response

share on: