सर्वाधिक तक्रारी पोलिसांविरुद्ध

share on:

मुंबई : अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी देशातील जनता ही मानवाधिकार आयोगाकडे येत असते. मात्र, आयोगाकडे आलेल्या सर्वाधिक तक्रारी या पोलिसांविरुद्ध असल्याचे

rights

समोर आले आहे. कायदेशीर कारवा  ई करण्यास पोलीस अपयशी ठरल्याच्या सुमारे २ लाख ७0 हजार तर खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतवल्याच्या ७0 हजार तक्रारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आल्या आहेत.

महाराष्ट्रात एकूण तक्रारींपैकी ५५ ते ६0 टक्के तक्रारी या सरकारी अधिकार्‍यांविरोधी असल्याचे उघड झाले आहे. आयोगाकडे वर्षाला पाच ते साडेपाच हजार तक्रारी नव्याने दाखल होत असून, राज्यातील मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नागपूर आणि विदर्भ आदी भागांतून या तक्रारी येतात. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे फेब्रुवारी २0१२मध्ये आयोगाचे अध्यक्ष नवृत्त झाल्याने सप्टेंबर २0१३पर्यंत, सुमारे १८ महिने आयोगाला अध्यक्षच नव्हते. त्यामुळे या काळात १३ हजार ११४ तक्रारी प्रलंबित होत्या. मात्र, गेल्या दोन महिन्यांमध्ये ३00 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, १३ हजार ११४ तक्रारी अनिर्णीत आहेत.

दैनंदिन जीवनात मानवाच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून आंतराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी १0 डिसेंबर हा दिन ‘जागतिक मानवी हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. १९४८ साली युनायटेड नेशनच्या सर्वसाधारण सभेत हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्क दिन म्हणून साजरा करावा, असे जाहीर केले होते.

यानंतर १९५0 सालापासून जगभरात मानवी हक्क दिन साजरा केला जाऊ लागला. यामध्ये राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्राच्या बरोबरीने ६0 हून अधिक क्षेत्रांचा समावेश केला आहे.

आयोगाकडे तक्रार कशी नोंदवाल?
-एका साध्या कागदावर तक्रारदाराने तक्रार लिहून आयोगाच्या कार्यालयात आणून द्यावी.
-तक्रारदाराला आयोगाच्या नावानेच तक्रार दाखल करावी लागते.
-तक्रारदाराने नाव, पत्ता, फोन नंबर लिहिणे गरजेचे आहे. तसेच ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्याचे नावही नमूद केले पाहिजे.
-तक्रारदाराची तक्रार आयोगाच्या अध्यक्षांकडे जाते व ज्याच्याविरोधात तक्रार आहे, त्याला नोटीस पाठविली जाते.
-ज्याच्याविरोधात तक्रार आहे, त्याचे उत्तर समाधानकारक नसल्यास त्याच्याविरोधात कारवाईला सुरुवात  होते.

Leave a Response

share on: