ऑपरेटिंग सिस्टीममध्ये Appleचे एक पाऊल पुढे

share on:

दिवसेंदिवस बाजारात स्वस्त व दर्जेदार मोबाइल हॅण्डसेटची संख्या वाढत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइल कंपन्या हॅण्डसेटधारकांना सर्वोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयत्न ‘आयओएस-७’ ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम लाँच करून ‘अँपल’ने केला आहे. आयफोनसाठी अँपल कंपनीने सन २00७ मध्ये प्रथमच ‘आयओएस’ (previously iPhone OS) ही ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आणली. तेव्हापासून त्यामध्ये थोड्या फार प्रमाणातच बदल केले होते. मात्र, ‘आयओएस-७’ लाँच करून ‘यूजर इंटरफेस’चा संपूर्ण लूक अँण्ड फील बदलला आहे. ‘आयओएस-६’च्या तुलनेत या नवीन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बराच बदल करण्यात आला असून त्याची ही काही खास वैशिष्ट्ये…

स्क्रिन लॉक असताना एका स्वाइपमध्ये निवडा ११ ऑप्शन! 
तुम्हाला गाणी ऐकायची आहेत, हॅण्डसेट एअर प्लेन मोडवर टाकायचा आहे, फ्लॅश लाइट ऑन करायची आहे, मग यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये जाण्याची गरज नाही. आयफोनचे सेंटर बटण केवळ दोन वेळा दाबून- बॉटम टू टॉप स्वाइप करा व एअर प्लेन, वाय-फाय, ब्ल्यू टूथ, डू नॉट डिस्टर्ब, ओरिएंटेशन लॉक, टॉर्च, घड्याळ, कॅलक्युलेटर, डिस्प्ले ब्राइटनेस, म्युझिक ऑन द गो आणि कॅमेरा या गोष्टींचा सहज अँक्सेस मिळवू शकता आणि तेही स्क्रिन लॉक असताना.

अँप्स स्टोअर
अँप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्या अँप्लिकेशनचे अपडेटेड व्हर्जन उपलब्ध झाल्यास अँप्स स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला अँप्लिकेशन मॅन्युअली अपडेट करावे लागते. पण, आता ते करण्याची गरज नाही. ‘आयओएस-७’मध्ये ऑटोमॅटिक अपडेट हा पर्याय दिल्याने तुम्हाला स्वत: अँप्लिकेशन अपडेट करावे लागत नाही. विशेष म्हणजे जर एखाद्या विशिष्ट वयोगटासाठी हवे असलेले अँप्लिकेशन तुम्हाला पाहिजे असेल, तर ते देखील तुम्ही सहज शोधू शकता.

अँप्लिकेशन
एकाच वेळी वेगवेगळे अँप्लिकेशन (फेसबुक, ट्विटर, मेल-बॉक्स, नोट्स आदी.) ओपन करण्यासाठी व नंतर ते बंद करण्यासाठी आता सेंटर स्विच दाबून रेड क्रॉसवर क्लिक करण्याची आवश्यकता नाही. ‘आयओएस-७’ मुळे आता उजवीकडे किंवा डावीकडे स्वाइप करून तुम्ही पाहिजे त्या अँप्लिकेशनवर जाऊ शकता व ‘बॉटम टू टॉप’ स्वाइप करून नको असलेले अँप्स बंद करू शकता. तसेच एअर ड्रॉप, कंट्रोल सेंटर, सिरी, कॅमेरा फिक्चर यासारखे नवीन पर्यायदेखील आयओएस-७ मध्ये देण्यात आले आहेत.

क्विक अँलर्ट
तुमचे उद्याचे शेड्युल काय आहे, गेल्या २४ तासांमध्ये तुम्हाला कोणी ई-मेल पाठवलेत, एसएमएस केलेत किंवा एखादा कॉल सुटलाय, तर मग यासाठी तुम्हाला संबंधित ऑप्शनमध्ये जाऊन बघण्याची आता गरज नाही. आयओएस-७ मध्ये ‘टुडे, ऑल आणि मिस्ड’ हे तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामुळे फोन लॉक असतानासुद्धा केवळ टॉप टू बॉटम स्वाइप करून तुम्हाला सुटलेले आणि न पाहिलेले मेल, मेसेज आणि कॉल्सची क्विक माहिती मिळेल.

सर्फिंग झाले आणखी सोपे!
काही महत्त्वाच्या वेबसाइटला तुम्ही वारंवार भेट देत असाल आणि एकाच वेळी तुम्हाला पाच-सहा टॅब ओपन करायचे असतील, मग तुमच्यासाठी सफारी ब्राऊजर हा उत्तम पर्यायapple-image आहे. ज्या वेबसाइटचा तुम्ही अधिक वापर करता, त्या वेबसाइटचा ‘यूआरएल’ आयकॉन तुम्ही चक्क तुमच्या होम स्क्रिनवर आणू शकता. त्यामुळे ब्राऊजरमध्ये न जाता केवळ एका क्लिकवर तुम्ही ते संकेतस्थळ उघडू शकता. शिवाय, पिरॅमिड स्टाइलमुळे ब्राऊजरमधील कोणत्याही टॅबवर तुम्ही सेकंदात जाऊ शकता.

जर तुम्ही आयफोन वापरत असाल आणि आयओएस-७ अपडेट केले नसेल, तर करण्यास काहीच हरकत नाही. ज्यांच्याकडे आयफोन, आयफोन 3-जी आणि आयफोन 3-जीएस आहे, त्यांना आयओएस-७ अपडेट करता येणार नाही. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आयफोन-४, ४एस, ५, आयपॉड टच, आयपॅड, आयपॅड -२, ३, ४ आणि मिनी यांच्यासाठी उपलब्ध आहे, तर एअरड्रॉप, सिरी, कॅमेरा फिक्टर या गोष्टी आयफोन-४ वापरणार्‍यांसाठी दिलेल्या नाहीत.

इन शॉर्ट काय तर आयओएस-७ मुळे तुम्हाला नवीन इंटरफेस, न्यू फॉण्ट स्टाइल अनुभवायला मिळेलच, पण त्यासोबत क्विक अँक्सेस आणि ‘ऑल इन वन’ ऑप्शनमुळे वेळही वाचेल. ‘आयओएस-७’च्या नवीन इंटरफेसमुळे अपग्रेडेड व्हर्जनचे मॉडेल घेतल्याचा फील तुम्हाला नक्की येईल.

share on:
admin

admin

Pratik Mukane is an engaging journalist with a strong presence and a passion for writing and constantly chasing breaking news. He enjoys meeting new people, telling meaningful stories and having a few cups of coffee in between!

Leave a Response