अ‍ॅप्ट् अ‍ॅप्स!

share on:

एखादा नवीन मोबाइल फोन विकत घेतला की आपली लगबग सुरू होते ती अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी. सोशल नेटवर्किंग, ट्रॅव्हल, न्यूज, फोटोग्राफी यासारख्या विविध प्रकारचे ‘पेड आणि फ्री’ अ‍ॅप्लिकेशन अँप स्टोअरमध्ये लाखोंच्या संख्येने उपलब्ध असतात. त्यामुळे रँडम सर्च करून अनेकदा आपण अँप स्टोअरमध्ये अ‍ॅप्लिकेशन शोधण्याचा प्रयत्न करतो. पण नेमके कोणते अ‍ॅप्स डाऊनलोड करावेत याबाबत नेहमीच आपण संभ्रमात पडतो. मात्र, तुम्ही आयफोन वापरत असाल किंवा नुकताच नवीन आयफोन विकत घेतला असेल, तर ही मोस्ट युजेबल अँप्लिकेशन्स नक्की डाऊनलोड करा!

अँडोब फोटोशॉप एक्स्प्रेस

एखादा समारंभ, इव्हेंट किंवा पार्टीचे फोटो तुम्हाला एडिट करून कोणाला पाठवायचे आहेत? किंवा सोशल मीडिया साईट्वर शेअर करायचे आहेत? मग ‘आयफोन’ युर्जससाठी
‘फोटोशॉप एक्स्प्रेस’ हे उत्तम अ‍ॅप्लिकेशन आहे. आजवर केवळ डेस्कटॉप पीसी आणि लॅपटॉपवर डिजिटल फोटोग्राफी एडिटिंगसाठी प्रचलित असलेले ‘फोटोशॉप’ आता अँपल अँपस्टोअरमध्येदेखील उपलब्ध झाले आहे. क्रॉप, रोटेट, व्हाइट बॅलेन्स, ऑटो फिक्स, इफेक्ट्स, बॉर्ड्स, कोलाज यासारखे विविध एडिटिंग पर्याय यामध्ये देण्यात आले असल्याने हॅण्डसेटमध्येच फोटोशॉप वापरणे शक्य आहे.

एव्हर नोट

आजच्या या धकाधकीच्या जीवनात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, इमेजेस, ऑडिओ फाइल, प्रिझेंटेशन, रिपोर्ट्स यांची आवश्यकता कधी लागेल, हे आपणही सांगू शकत नाही. पण जर यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी नेहमीच, किंबहुना तुम्ही जिकडे असाल तिकडे तुमच्या सोबत असल्या तर? होय, एव्हर नोट या अँप्लिकेशनद्वारे हे शक्य आहे. एव्हर नोटमध्ये आपले एक अकाऊंट बनवा आणि नेहमी लागणार्‍या गोष्टी सेव्ह करून ठेवा व पाहिजे तेव्हा त्यांचा अँक्सेस मिळवा. तुम्ही घरी असाल किंवा प्रवास करत असाल, ‘ऑन द गो’ तुमच्या आयफोनवरच तुम्ही काम करू शकता.

गुगल ट्रान्सलेट

अनेकदा असं होतं की आपल्याला एखाद्या शब्दाला इंग्रजी, हिंदी किंवा मराठीत काय म्हणतात, हे माहीत नसतं. मग अशा वेळी त्या शब्दाचा अर्थ शब्दकोशात शोधून त्याचे भाषांतर आपण करतो. पण जर केवळ एका क्लिकमध्ये ‘त्या’ शब्दाला ३0 पेक्षा अधिक भाषांमध्ये काय म्हणतात हे कळलं तर? वेळही वाचेल आणि आपल्या ज्ञानातही भर पडेल. ‘गुगल ट्रान्सलेट’मध्ये जाऊन ज्या शब्दाचे-वाक्याचे ज्या भाषेमध्ये भाषांतर करायचे आहे, ती भाषा निवडा आणि शब्द टाइप करताच त्याचे भाषांतर होईल. केवळ शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पत्रकारिता, रिसर्च आदी क्षेत्रांत असलेल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. पण हे अँप्लिकेशन वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये इंटरनेट सुरू असणे आवश्यक आहे.

फाइंड माय ‘आयफोन’

कदाचित या अ‍ॅप्लिकेशनची गरज तुम्हाला भासणार नाही. परंतु हे अँप्लिकेशन असणे आवश्यक आहे.  हजारो रुपये खर्च करून घेतलेला आयफोन हरवला तर आर्थिक फटका सोसावा लागेलच. पण जर त्यामध्ये असलेली महत्त्वपूर्ण माहिती किंवा फाइल्स इतर कोणाच्या हाती लागल्या तर आपली पंचाईत होऊ शकते. अशा वेळी फाइंड माय आयफोन हे अँप महत्त्वाचे ठरू शकते. पूर्वी ही सुविधा ‘पेड’ होती, पण आता ती फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अँपद्वारे ‘मी डॉटकॉमवर’ जाऊन तुम्ही आय-डिवाइस शोधू शकता. तुमचा फोन लॉक करण्याचे व संदेश पाठविण्याचे ऑप्शन यामध्ये देण्यात आले आहे. तर महत्त्वाचा डेटादेखील तुम्ही डिलीट करू  शकता. जरी तुमचा फोन तुम्हाला मिळवता आला नाही, तर किमान त्यामध्ये असलेला डेटा इतर कुणाच्या हाती लागणार नाही.

 इन्स्टाग्राम

ज्याप्रकारे फेसबुक, ट्विटर या सोशल मीडिया साइटद्वारे आपण इतरांशी कनेक्टेड राहू शकतो, त्याच प्रकारे फोटोच्या माध्यमातून जगातील काना-कोपर्‍यातील लोकांशी एकरूप होण्याचे उत्तम अ‍ॅप्लिकेशन म्हणजे इन्स्टाग्राम. इन्स्टाग्रामवर तुमच्या स्वत:चे अकाऊंट बनवा आणि फोटो अपलोड करण्यास सुरुवात करा. ट्विटरप्रमाणेच ‘फॉलो’ करण्याचा पर्याय यामध्ये देण्यात आला आहे. म्हणजेच इन्स्टाग्रामवर असलेल्या लाखो सदस्यांपैकी जर तुम्ही एखाद्या प्रसिद्ध छायाचित्रकाराला फॉलो करत असाल, तर त्याने इन्स्टाग्रामवर टाकलेले फोटो तुमच्या फिडमध्ये दिसतील. तसेच तुमचे फॉलोअर्स तुमच्या फोटोला लाइक करत असतील किंवा कमेंट करत असतील, तर तसे नोटिफिकेशनदेखील तुम्हाला मिळते. विशेष म्हणजे १५ सेकंदांचा व्हिडीओदेखील अपलोड करणे आता शक्य झाले असून इन्स्टाग्राम तुम्ही तुमच्या फेसबुक पेजसोबत सिन्क्रोनाईज करू शकता.

पल्स 

हल्ली ऑनलाइन कन्टेन्ट वाचण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. अँप स्टोअरमध्ये रिडर्स अँप्लिकेशनची संख्यादेखील कमी नसून त्यांचा दर्जादेखील उत्तम आहे. पण पल्स अँप्लिकेशन तुम्हाला ब्लॉग, न्यूजपेपर आणि मासिक एकाच ठिकाणी वाचता येतात. एखादी आवडलेली बातमी सहज सोशल मीडियावर शेअर करता येते. तर रीडर आरएसएस फीडदेखील तुमच्या न्यूज फीडमध्ये घेता येतात. एखादा वाचनीय लेख वेळेअभावी त्वरित वाचता येत नसेल, तर तो सेव्ह करण्याचा पर्यायदेखील यामध्ये देण्यात आला आहे.

क्विक ऑफिस

डॉक्युमेंट, प्रेझेंटेशन बघण्यासाठी आणि एडिट करण्यासाठी अँप स्टोअरमध्ये बरेच अँप्स आहेत. परंतु काही अँप केवळ ट्रायल व्हर्जन देतात, तर काही पेड आहेत. पण आता ट्रायल अँप किंवा पेड अँप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. कारण गुगलच्या ‘क्विक ऑफिस’द्वारे तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड डॉक्युमेंट, एक्सेल फाईल आणि पीपीटी बघू शकता व एडिटदेखील करू शकता. गुगल अकाऊंटद्वारे एकदा साइन-इन केले, की तुम्ही तयार केलेली फाइल गुगल ड्राइव्हवर सेव्ह करता येऊ शकते. फाइल सेव्ह करण्यासाठी तुम्हाला १५ जीबीपर्यंतची स्पेस मिळते. तसेच या फाइल्स तुम्ही कोणत्याही कॉम्प्युटर किंवा मोबाइलवरून अँक्सेस करू शकता.

 

share on:
Pratik Mukane

Pratik Mukane

Pratik Mukane is an engaging journalist with a strong presence and a passion for writing and constantly chasing breaking news. He enjoys meeting new people, telling meaningful stories and having a few cups of coffee in between!

Leave a Response